वजन कमी Weight Loss Diet Plan / वजन कमी करण्यासाठी डाएट प्लॅन

Spread the love
31 Views

नमस्कार मित्रानो,
सध्या २१ व्या शतकात धकाधकिच्या जीवनात आपण सगळयाना आपल्या शरीराकडे लक्ष देन्यास वेळ मिळानासे झाले आहे. त्याचाच परिणाम म्हणुन आज खुप लोक लट्ठपणा, अति वजन चे शिकार होत आहेत.
तर आज आपण जाणुण घेणार आहोत की वजन कमी करण्यसाठी काय आहार पथ्य पाळायला पाहिजे किंवा जेवणाचे काय निमय पाळायला पाहिजे——

सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान : नाश्ता (४०० ते ५०० कॅलरीज)
दोन पोळ्या किंवा ब्राऊन ब्रेडचे तीन स्लाइज, एक वाटी डाळ किंवा पालेभाजी, एक प्लेट सलाड (गाजर, मुळा, काकडी), साय काढलेलं दूध या पर्यायांपैकी एखादा निवडू शकता. तुम्ही तुमच्या आवडीच्या पदार्थांचं सेवन करू शकता, पण मिठाईसारख्या जास्त कॅलरीजच्या पदार्थांचा समावेश करू नये.

सकाळी ११ ते १२च्या दरम्यानचा आहार
मंचिंग (पन्नास ते शंभर कॅलरीज) : भाजलेले चणे-शेंगदाणे किंवा फायबरचं प्रमाण अधिक असलेल्या बिस्कीटांचं सेवन करू शकता. या वेळेत मंचिंग केल्यामुळे दुपारी कमी खाल्लं जातं

दुपारी १ ते २ च्या दरम्यान : जेवण (३०० ते ३५० कॅलरीज

दुपारी जेवताना एक-दोन पोळ्या किंवा एक ते दोन वाटी भात खाऊ शकता. एक वाटी आमयटी किंवा डाळ (पाण्याचं प्रमाण जास्त असलेली), पालेभाजी (एक वाटी) आणि सलाड (१५० ते २०० ग्रॅम) याचाही दुपारच्या आहारात समावेश करू शकता.

संध्याकाळी ४ ते ५ दरम्यान काय खावे ? :-

 मंचिंग (५० ते १०० कॅलरीज) : कमी साखरेचा चहा किंवा कॉफी घेऊ शकता. त्यासोबत भाजलेले चणे, शेंगदाणे किंवा मखाणे खाऊ शकता.

रात्री ७.३० ते ८.३०च्या दरम्यान : रात्रीचं जेवण (२०० ते २५० कॅलरीज)

संध्याकाळी काहीतरी खाणं होतंच. त्यामुळे रात्री कमी खाल्लं जातं. रात्री जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्यायलं तर कमी खाल्लं जातं. एक पोळी, वरण, टोन्डमिल्क किंवा साय काढलेलं दूध यापैकी काहीही खाऊ शकता. गोड खायची इच्छा झाल्यास साधारण दोन ते पाच ग्रॅम गूळ खावा. यामधून तुम्हाला १० ते २० कॅलरीज मिळतील.

मैदा, साखर, मीठ, भात यासारख्या पांढऱ्या रंगाच्या गोष्टींचं कमीतकमी सेवन करा. तेल, तूप, बटर, मिठाई, चॉकलेट, चिप्स, जंक फूड, पोळी, बटाटा यांसारख्या वस्तू पूर्णपणे टाळू नका, पण अतिरेक टाळा.

लक्षात ठेवा
थंड पाणी पिणं कटाक्षानं टाळा. थंड पाणी प्यायची इच्छा झाल्यास माठातील पाणी प्या. कोमट पाणी प्यायल्यास वजन लवकर कमी व्हायला मदत होते आणि पचनक्रिया देखील सुरळीत पार पडते.

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका सर्वांचे आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *