आज आपण जाणुण घेणार आहोत की वजन कमी करण्यसाठी आपला दिनचर्या कशी असायला पाहिजे..

143 Views

लठ्ठपणा हा एक जटिल आजार आहे. ज्यामध्ये शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त असते. लठ्ठपणा ही एक वैद्यकीय समस्या आहे ज्यामुळे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि विशिष्ट कर्करोग यासारख्या इतर रोग आणि आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. लठ्ठपणा हा साधारणपणे जास्त खाल्ल्याने आणि खूप कमी हालचाल केल्यामुळे होतो.

लठ्ठपणा ही जगातील सर्वात मोठी आरोग्य समस्या आहे. हे अनेक परिस्थितींशी संबंधित आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, वाढलेली रक्तातील साखर यांसारख्या कारणांचा यांचा समावेश आहे.

 जर तुम्ही व्यायाम आणि शारीरिक हालचालींद्वारे उर्जा नष्ट केली नाही, तर जास्तीची उर्जा शरीरात चरबीच्या रूपात साठवली जाईल. मित्रानो आज जाणून घेणार आहोत कि आयुर्वेदानुसार आपलं दिनचर्या कशी असायला पाहिजे.

आयुर्वेदानुसार दिवसभर प्रत्येक तासाला एक दोष आपल्या शरीरात कार्यरत असतात, तर ते पूढीलप्रमाणे –

कफ – सकाळी 6:00 ते रात्री 10:00
पित्त– सकाळी 10:00 ते दुपारी 2:00
वात – रात्री 2:00 ते संध्याकाळी 6:00

जर आपण हया चक्रानुसार आपल जेवणाच वेळ,आणि काम ठरवल तर आपल्याला निरोगी,आनंदी व वजन कमी करण्यास मदत होणार आहे.

सकाळी 3:00 ते 5:00 –
हया वेळी शरीराच तापमान कमी असतो आणि शरीर व बुद्धि शांत असते.
तुम्ही सकाळी 5:00 च्या आत उठुन प्रार्थना करु शकता, ऑइल पुलिंग म्हणजे तेलाने गुळणा करणे या पद्धतीला आयुर्वेदात कवला किंवा गंडुश असे म्हणतात हे करु शकता.

सकाळी 5:00ते 7:00
ह्यावेळेस रक्तदाब चांगला असतो. ह्यावेळेस तुम्ही योग करा,कोमट पाणि प्या,दीर्घ श्वास घ्या आणि व्यायाम करण्याआगोदर थोड नाश्ता करु शकता.

सकाळी 7:00ते 9:00 –
हयावेळेस शरीरातील टेस्टेस्टेरॉन लेवल जास्त असते. त्याचा उपयोग तुम्ही व्यायाम करन्यासठि करु शकता. नंतर शरिराला चांगल्या प्रकारे मसाज करा आणि आंघोळ करा.

सकाळी 10:00 ते 12:00 –
हया वेळी शरीर पूर्णपणे जागरूक असते.त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या दररोजचे काम करण्यात घालवु शकता.थोड नाश्ता पण करु शकता.

दुपारी 12:०० ते 2:०० –
ह्यावेळी तुम्ही जेवण करुन आराम करु शकता.

दुपारी 3. ०० ते 6.30 –
संध्याकाळी आपल्या स्नायु खुप बळकट असतात. तुम्ही थोड व्यायाम करु शकता आणि थोड खाऊ शकता.

संध्याकाळी 6:30 ते 7:00

ह्यावेळेस रक्तदाब चांगला असतो. तर तुम्ही ह्यावेळी आपल दिवसभराच कामाचा आढावा घेऊ शकता आणि हा वेळ रात्रिच्या जेवाणासाठी योग्य असल्याने तुम्ही लवकर जेवण करुन लवकर झोपु शकता.

रात्री 7.30 ते 8.30

ह्यावेळेस शरीराच तापमान हा जास्त असतो. ह्यावेळेस तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवु शकता,वाचन करु शकता तसेच आपल्या पायाना मसाज पण करु शकता.
लवकर झोपण्याने सुद्धा आपला वजन कमी होऊ शकतो.

तर अशाप्रकारे निरोगी दिनचर्या जर आपण पाळलो तर आपला वजन कमी होण्यास खुप मदत होईल.

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. सर्वांचे आभार🙏.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *