want to loose weight eat this / वजन कमी करायचे आहे हे खा

Spread the love
29 Views

वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या आहार पद्धती अस्तित्वात आहेत. परंतु व्यक्तीनुसार याचे फायदे बदलत असतात. तुम्हाला कुठली आहार पद्धती योग्य व फायदेशीर ठरेल हे योग्य तज्ञाच्या मार्गदर्शनाने ठरवुन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करावी.

काही व्यक्ती आपली भूक कमी करण्यावर लक्ष केंद्रित करतात तर काही लोक कॅलरी, कार्ब किंवा चरबी प्रतिबंधित आहारचे सेवन करतात.

यात सर्वांनीच आपली आहार पद्धती श्रेष्ठ असल्याचा दावा केल्याने, कुणी कोणती आहार पद्धती अवलंबावी हे जाणून घेणे कठीण आहे.

शाकाहारी आहार

शाकाहारी आहारामधे सर्व प्राणीज उत्पादनांच्या सेवनास वर्ज्य केले जाते या आहारामागे नैतीक, पर्यावरणीय व शारीरिक आरोग्य हे सर्व उद्देश आहेत. हा आहार प्राण्यांचे शोषण आणि क्रूरतेच्या प्रतिकाराशी संबंधित आहे. vegan diet हा शाकाहाराची अत्युच्च पातळी आहे.

ही शाकाहारी पद्धती ही आपल्या कडील शाकाहारप्रमाणे नाही. यात मांस, मटन, मासे, मध, दुध, अंडी असे सर्वच प्राणीज आहार द्रव्यांवर प्रतिबंध तर केला जातो पण आहारात कमी शीजवलेला प्रक्रिया विरहीत असा नैसर्गिक आहार सेवन केला जातो.

वजन कमी करण्याच्या दृष्टीने शाकाहार खूपच प्रभावी असल्याचे दिसून येते – बहुतेकदा कॅलरीची मोजणी न करता देखिल शरीरातील अतिरिक्त चरबी यात बर्न होते कारण त्यातील कमी चरबी आणि जास्त फायबर युक्त आहार हा शरीरातील अतिरिक्त उर्जेच्या स्त्रोतास म्हणजेच चरबीस उर्जेमधे रुपांतरीत करतो.

परंतु आज कालच्या प्रक्रियायुक्त आहार तसेच किटकनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळे असा आहार पालन करणे व त्याचा शरीरास फायदे होण्यास काहिसा अडथळा येतो.

अधूनमधून उपवास

अधूनमधून उपवास करणे यालाच इंटरमिटेंट फास्टिंग म्हटले जाते यामधे काहि कालावधी पुर्ण उपवास आणि काही कालावधी नियमीत आहाराचे चक्र सुरु असते.

या आहार पद्धतीमधे कुठल्याही आहार पदार्थांवर नियंत्रन ठेवण्यापेक्षा आहाराच्या कालावधी वर नियंत्रन ठेवले जाते.

या आहार पद्धती मधे नाष्ता वगळला जातो व आपल्या रोजच्या खाण्याचा कालावधी आठ तासांवर मर्यादित ठेवला जातो, त्यानंतर दिवसातील उर्वरित 16 तास उपवास करणे यात समाविष्ट आहे. जर सकाळी ११ वाजता तुम्ही आहार घेतला तर रात्रीचा आहार ७ वाजेच्या आत घ्यावा व ७ वाजेनंतर दुसर्‍या दिवशी सकाळी ११ वाजेपर्यंत काहीही खाउ नये व पाण्याव्यतिरीक्त कुठेलेही पेय घेउ नये.

अल्ट्रा-लो-फॅट आहार

अल्प-चरबीयुक्त आहार आपल्या रोजच्या आहरातील चरबीच्या वापरास 10% कॅलरीज पर्यंत मर्यादित करतो.

सामान्यत: कमी चरबीयुक्त आहार अंदाजे 30% कॅलरी या फॅट च्या माध्यमातुन प्रदान करतो.

काही अभ्यासानुसार असे दिसून येते की दीर्घकालीन वजन कमी करण्यासाठी हा आहार योग्य नाही.

अल्ट्रा-लो-फॅट फॅट आहाराचे समर्थक असा दावा करतात की पारंपारिक कमी फॅट/ चरबीयुक्त आहार हा खरोखर फॅट ने कमी प्रमाणात नसतो आणि आरोग्यासाठी फायदे आणि वजन कमी करण्यासाठी चरबीचे सेवन एकूण कॅलरीच्या 10% पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *