Simple Hack For Weight Loss- Say No To Sugar ! / वजन कमी करायचा आहे साखरेला नको म्हणा !

Spread the love
34 Views

Simple Hack For Weight Loss- Say No To Sugar ! / वजन कमी करायचा आहे साखरेला नको म्हणा !

मित्रांनो काही पण बोला Weight Loss करणे एवढा पण सोपं नसते खूप वेळ घातल्यानंतर सुद्धा खूप लोकांना जेवढा पाहिजे तेवढा रिझल्ट भेटत नाही ज्यांना खूप जास्त आशा असते.


पण मित्रांनो आज मी तुम्हाला ह्या लेखांमध्ये एक गोष्ट सांगणार आहे. एक सगळ्यात सोपा उपाय त्यासाठी तुम्हाला खूप कमी त्रास घ्यावा लागेल आणि तुम्हाला कमी वेळ लागणार आणि सगळ्यात जास्त रिझल्ट मिळणार आहे आणि ते सोपे उपाय आहे साखर खाणं कमी करा !!


सोपा ? हो हेच. मी तुम्हाला गोड खाण्यापासून रोखणार नाही. त्या जागी आरोग्यदायी उपाय आहेत ते तुम्ही वापर करू शकता. जसे की साखरेसारखेच गोड असतात, खूप ठिकाणी उपलब्ध पण असतात आणि स्वस्त पण असतात. तर चला चालू करूया..

https://weightlossmarathi.com/best-ways-to-burn-belly-fat-in-just-7-days-in-marathi/

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागतआहे ,

सगळ्यात नुकसान धारक पदार्थ जे लोक दररोज खातात तर ते आहे फक्त साखर. हे फक्त शरीराला नुकसानकारक नसून एक आकर्षित करणारे घटक आहे. अभ्यासक्रमानुसार हे ठरवले गेलेला आहे की साखर हे कोकेन पेक्षा 8% जास्त आकर्षित करणारा घटक आहे. तेच कोकेन जे खूप काही देशात बंदी आहे.

एका अभ्यासक्रमानुसार 94% उंदीर अगोदर पासूनच कोकेन सेवन करत होते. जेव्हा त्यांना साखर खायला दिलं तेव्हा पुढच्या वेळेस त्यांनी कोकेन ऐवजी साखर खाणं पसंत केले. साखर हे असं घटक आहे ज्याच्या वरती पूर्ण food Industry अवलंबून आहे.

ड्रिंक्स, ज्यूस बिस्किट केचप चॉकलेट, फ्लेवर सिरीयल तुम्ही काही पण बघा सगळे फक्त साखरेवरती अवलंबून आहेत. त्यामुळे जेव्हा आपण साखर खातो तेव्हा आपलं मेंदू एक घटक आपल्या डोक्यामध्ये रिलीज करत असते त्यामुळे, आपल्याला सारखा साखर खाऊ वाटू लागते.

त्यामुळेच लोकांना साखर खाणे सोडणं एवढा अवघड होऊन बसते.

पण असं झालं तर, जिथे तुम्हाला साखर खायचं कमी करावा लागत नाही पण, त्याऐवजी तुम्ही काहीतरी घटक खाल जे तुम्हाला साखर खाल्यासारखाच वाटेल. त्यामध्ये नैसर्गिकपणे मिळत असलेल्या फळभाज्या जे, आपल्या शरीराला त्रास तर पोहोचवत नाही.

त्याचप्रमाणे आपल्याला साखरेचे किंवा गोड खाल्ल्याचं समाधान पण वाटेल. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये साखरे सोबतच फायबर, Vitamin C , मिनरल्स असतात जे आपल्या शरीरामध्ये साखर खूप कमी प्रमाणात आणि सावकाश रिलीज करतात.

दुसरीकडे क्रिस्टल साखर जे केमिकल पासून बनते त्याच्यामध्ये मिनरल वाचत नाही किंवा कुठले विटामिन नसते किंवा फायबर नसते, प्रोटीन नसते, त्याच्यामध्ये काही पण न्यूट्रियन्स नसतात फक्त असते कॅलरी जे आपलं वजन वाढण्यास कारणीभूत असते.

तर मित्रांनो साखर खाल्ल्यामुळे आपल्या वजन तर वाढणारच. त्याचप्रमाणे आपल्या शरीरावरती सुरकुत्या पडायला चालू होते, आपल्या डोळ्याभोवती डार्क सर्कल पडतात, आपल्या तोंडावर पुरळ यायला चालू होते आणि आपलं दाताचे आरोग्य पण खराब होते आणि टाईप टू डायबिटीस सारख्या रोगांना आमंत्रण देते.


मित्रांनो तुम्ही एक साधं संशोधन करा पुढील 21 दिवसांसाठी तुम्ही साखर सोडून त्याच्या जागी तुम्ही हे आरोग्यदायी पदार्थ वापरा तर बघा तुमच्या शरीरात काय फरक पडते…

1-कोकोनट शुगर

तर कोकोनट शुगर हे नैसर्गिकरित्या नारळ पासून बनवले जातात कुठलेही केमिकल न वापरता. रिफाइंड साखरेपेक्षा कोकोनट शुगर हे खूप लवकर आपल्या शरीरात पचन होते.

त्याचप्रमाणे त्याच्यात आयर्न, पोटॅशियम, झिंक, कॅल्शियम चे प्रमाण पण खूप मोठ्या प्रमाणात असते. मित्रांनो कोकोनट शुगर इंडेक्स पण फक्त सहा असते जे की आपल्या नॉर्मल शुगर पेक्षा खूप कमी आहे. कोकोनट शुगरच वापर तुम्ही दुधामध्ये, दही मध्ये, केक मध्ये कुठे पण वापरू शकता. त्याप्रमाणे दररोज नाश्त्यामध्ये पण तुम्ही वापरू शकता. कोकोनट शुगर हे तुम्हाला बाजार मध्ये भेटेल.

2-डेट शुगर

What is Date Sugar ? तर नावावरूनच आपल्याला कळते की, डेट शुगर हे खजुरापासून बनते. खजूर हे नैसर्गिकपणे खूप गोड असते म्हणून ह्याच साखर वापरण्यास खूप चांगले आहे आणि त्याला तयार करणे पण खूप सोपा आहे.

त्याला तुम्ही घरी पण बनवू शकता फक्त खजूरला तुम्ही भाजून घ्या (रोस्ट करा) आणि त्याला मिक्सरमध्ये घालून किसून घ्या (ग्राइंड करा) आणि त्याचा पावडर शोषून घ्या. खजुरा पासून बनलेल्या ह्या साखरेमध्ये फायबर खूप मोठ्या प्रमाणात असतात, त्याचप्रमाणे याच्यामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स पण खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे आपल्या हाडांची ताकत वाढते.

डेट शुगरचं ग्लासमिक इंडेक्स 45 ते 50 असते आणि त्याच प्रकारे ते डिपेंड करते की खजूर कुठल्या जातीचा आहे. तर हे साखर तुम्ही दुधामध्ये घालू शकता आणि कुठल्या पण गोड पदार्थ तयार करण्यासाठी वापरू शकता. डेट शुगर थोडा महाग जरूर भेटेल पण याचे फायदे खूप जास्त आहेत.

You may like this : https://youtu.be/-RnF15qfIHU

3-खडीसाखर

आम्ही भारतीय ह्या खडीसाखरचा उपयोग न जाणे कधीपासून करत आहोत. खडीसाखर सेम साखरेसारखाच असतो. खडीसाखर खाण्याचे फायदे खूप जास्त असतात.

हे खूप विचार करण्यासारखं गोष्ट आहे की न जाणे आपण कधी खडीसाखर चा वापर सोडून ह्या हानिकारक साखरे कडे वळलो आहोत. मित्रांनो हे तुम्ही हे तुम्हाला माहित आहे का जेव्हा रिफाईंड शुगर बनते त्याच्या एका केमिकल प्रोसेसच्या अगोदर खडीसाखर तयार होते. खडीसाखर हे कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फायबर ,अँटीऑक्सिडंट ने भरभरून असते. खडीसाखर पचनक्रिया पण वाढवते आणि हिमोग्लोबिन सुद्धा वाढवते साखरेच्या विरुद्ध खडीसाखर चा उपयोग आपल्या शरीरासाठी होतो.

खडीसाखर तुम्ही जसं पाहिजे तसं वापर करू शकता. चहा, कॉफी, दूध, ज्यूस मध्ये, गोड पदार्थासाठी. फक्त ध्यानात ठेवा की मोठी खडीसाखर तुम्ही खरेदी करत आहात. जे बाजारामध्ये लहान खडीसाखर मिळते ते कधीच खरेदी करू नका कारण ते रिफाईंड साखरेचा मोठा भाग असतो खडीसाखर तुम्हाला कुठल्याही दुकानात भेटेल.

तर तुम्ही साखरेऐवजी वरील वस्तू वापरून आपले वजन कमी करू शकता आणि साखरेपासून जे नुकसान आपल्या शरीराला होते त्यापासून पण तुम्ही वाचू शकता.

Read more article : https://weightlossmarathi.com/best-ways-to-burn-belly-fat-in-just-7-days-in-marathi/

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. 
सर्वांचे आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *