simple and effective way of burning fat/ चरबी जाळण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग

Spread the love
42 Views

वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी लोक अनेक मार्गांनी प्रयत्न करतात. आपण देखील त्यापैकी एक असाल तर आपण काही गोष्टींचा आपल्या दररोजच्या आहारामध्ये (Diet) समावेश करून वजन कमी करू शकता. मात्र, अनेकांचे म्हणणे असते की, पोटावरील चरबी व्यायाम आणि डाएट करून देखील जात नाही.

जर तुम्हाला पोटाची चरबी / burning fat आणि शरीरातील चरबी काढून टाकायची असेल, तर तुमच्या आहारातून कार्बोहायड्रेट आणि साखर काढून टाकण्याची गरज आहे. कमी चरबीयुक्त अन्नानेही वाढलेले वजन कमी करता येते.

कॅलरीज मोजा Burning Fat

कमी खाणे किंवा कॅलरीज मोजणे हे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. काही अभ्यासातून असे दिसून आले आहे की फूड डायरी ठेवल्याने किंवा तुमच्या जेवणाचे फोटो काढल्याने तुमचे वजन कमी होण्यास मदत होते.

जे काही खातो ते डायरीत लिहा. हे आपल्याला कॅलरीज मोजण्यात देखील मदत करेल.

रात्री उशिरा खाणे टाळा burning fat

जेवणाची वेळ निश्चित करा आणि रात्री उशिरा जेवू नका. जर तुम्ही उशिरा जेवलात तर तुमचे अन्न पचत नाही आणि जेवल्यानंतर लगेच झोपल्याने लठ्ठपणाचा धोका असतो.

burning fat कमी साखरेचे सेवन

साखरेचे सेवन हे लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण आहे. बरेच लोक याचे जास्त सेवन करतात. साखरेमुळे लठ्ठपणा तसेच टाईप २ मधुमेह आणि हृदयविकार यांसारखे आजार होतात. वजन कमी करण्यासाठी, जोडलेली साखर कमी करा.

खाण्यावर लक्ष केंद्रित करा

अन्न खाताना तुमचे पूर्ण लक्ष खाण्याकडे असले पाहिजे, मोबाईल किंवा टीव्ही पाहताना अन्न खाऊन तुम्ही अति खाऊ शकता.

तुमचे मन दुसरीकडे कुठेतरी व्यस्त असल्यामुळे तुम्ही किती खाल्ले हे कळत नाही.

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *