हे सकाळी प्या आणि झटपट वजन कमी करा / morning drinks for weight loss

Spread the love
63 Views

लठ्ठपणा सामान्यत जास्त कॅलरी खाल्ल्याने होतो. विशेषत चरबीयुक्त आणि साखरेचे पदार्थ .

अतिरिक्त ऊर्जा जे शरीरात चरबीच्या रूपात साठवली जाते ते तुम्ही शारीरिक हालचाली न केल्यामुळे जळत नाही.

लठ्ठपणा ही एक सामान्य समस्या आहे कारण बर्‍याच लोकांसाठी आधुनिक जीवनामध्ये स्वस्त, उच्च-कॅलरी अन्न जास्त प्रमाणात खाणे आणि खाली बसून, डेस्कवर, सोफ्यावर किंवा कारमध्ये बराच वेळ घालवणे असे अनेक कारणे आहेत.

वजन कमी करण्यासाठी सकाळची पद्धत :
आपल्यापैकी असे किती जण आहेत ? ज्यांना वजन कमी करायचा आहे पण, डायटिंग करण्यासाठी वेळ नाहीये किंवा सकाळी उठून व्यायाम करण्यास वेळ नाहीये, सकाळी नाश्त्यामध्ये आपण पराठा तर बनवू शकतो पण काही आरोग्यदायी जेवण बनवणं अवघड वाटते.

दिवसभर तर घराबाहेर असतो, कामात व्यस्त असतो म्हणून आपल्याला वजन कमी करण्यासाठी वेळच भेटत नाही. आपण पण ह्या चक्रव्यूह मध्ये फसला तर आज आपण जाणून घेणार आहोत की हया पासून सुटका कशी मिळेल.


आज मी तुम्हाला सांगणार आहे की सकाळी करण्यासारखी काही गोष्टी जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल.

सकाळी लवकर उठल्याने तुमचं वजन कमी होण्यासोबतच तुमचं दैनंदिन कामे लवकर होईल, तुमचं काम करण्याची क्षमता वाढेल, तुमचा आरोग्य सुधारेल, प्रतिकारक क्षमता वाढेल आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होईल. तर चला चालू करू…


दिवसाची सुरुवात करा कोमट पाण्याने.सकाळी जेव्हा तुम्ही लवकर उठता, ऊठल्या ऊठल्या अगोदर किचनमध्ये जावा आणि गॅसवर पाणी गरम करायला ठेवा, पाणी थोडं कोमट झाल्यावर ते ग्लास मध्ये गाळून घ्या आणि निवांत एका ठिकाणी बसून सावकाश सावकाश प्या.

कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतील, ज्यामुळे आपल्या शरीरातील फॅट कमी करण्यास मदत होईल आणि खूप चांगल्या प्रकारे वजन कमी करण्यास मदत होईल.

सकाळी चहा पिण्याऐवजी तुम्ही गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्यायचं सुरू करा. चहा पिल्याने तुम्हाला समाधान वाटेल पण, त्याचा फायदा काही होणार नाही.

दिवसभर तुम्ही घराबाहेर असल्याने तुम्हाला चहा तर कुठे पण मिळू शकेल पण, लिंबू आणि मध घातलेलं गरम पाणी तुम्हाला भेटणार नाही. त्यामुळे सकाळी त्याचा फायदा तुम्ही घ्या.

त्याला बनवणं ही खूप सोपा आहे :

एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू कापून त्याचा रस पिळून घ्या आणि एक चमचा मध टाका. सकाळी घेतल्याने हे लिंबू पाणी तुमच्या शरीराला detox करण्यासाठी मदत करेल.

लिंबू पाणी पिण्याने तुमच्या शरीराच वजन कमी होईल. हे नियमितपणे घेतल्याने तुमचं वजन पण कमी होईल, तुमचा फॅट कमी होईल आणि आरोग्य सुधारेल आणि पूर्ण दिवस तुम्ही ताजेतवाने राहू शकाल.

तर अशाप्रकारे तुम्ही वरील पेय सकाळी प्यायला चालू केल्याने तुमचं वजन लवकरात लवकर कमी होण्यास खूप मदत होईल.

धन्यवाद.

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. सर्वांचे आभार🙏.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *