वजन कमी करण्यासाठी करा हा परफेक्ट डाएट / Magical Diet for weight loss in Marathi.

Spread the love
47 Views


आज आपण जाणून घेणार आहोत की वजन कमी करण्यासाठी आश्चर्यकारक जेवण पद्धती-
वजन कशी कमी करणार यासाठी मी आज तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे. हे तुम्हाला जर माहिती झालं तर तुम्ही किती पाहिजे तेवढं वजन कमी करू शकता. तर तुम्ही ह्याला म्हणू शकता जादू डायट. तर जादू डाएट म्हणजे काय ? तर जादू डायट मध्ये तुम्ही काही पण खाऊ शकता, किती पण खाऊ शकता, जेवढं तुमचं मन करील तेवढे खाऊ शकता तरीपण तुमचं वजन वाढणार नाही.


जेवण हे तीन-चार प्रकारचे असतात कॅलरी प्रकारे

आपण असं समजू की-

एक असते वीस रुपयाचे जेवण ज्याच्यामध्ये पाले भाज्या आणि सलाड येतात.

एक असते पन्नास रुपयांचं जेवण ज्याच्यामध्ये फळभाज्या ,फळे वगैरे येतात.

एक असते शंभर रुपये जेवण ज्याच्यामध्ये भाकरी, चपाती, भात असते .

आणि एक असते पाचशे रुपयाच जेवण ज्याच्यामध्ये तळलेले पदार्थ येतात, सगळे तेलकट.

तर जादू डाएट मध्ये तुम्ही वीस रुपयांचं आणि पन्नास रुपयाच जेवण जेवु शकता. त्याच्यामध्ये सगळे फळभाज्या आले, पालेभाजी आले ,ज्यूस वगैरे तुम्ही किती पहिजे तेवढे खाऊ शकतात, तरीपण तुमचं वजन कमी होत जाणार. ह्या प्रकारे तुम्ही एका महिन्यात 7 किलो पर्यंत वजन कमी करू शकता.

हे कशाप्रकारे होईल हे मी तुम्हाला सांगणार आहे.

तर तुम्हाला सकाळी नाष्ट्यामध्ये खायचा आहे खूप सारे फळ, सलाड आणि ज्यूस.

लंच मध्ये खूप सार्‍या पालेभाज्या तुम्ही कापून कुठल्याही भाजी सोबत खाऊ शकता आणि रात्रीच्या जेवण मध्ये खूप साऱ्या पालेभाज्या शिजवून किंवा सुप तयार करून खाऊ शकता. जर तुम्ही अशा पद्धतीने आपला दिवस घालवला तर तुम्हाला रोटी,चपात्या, किंवा भात काही खाण्याची जरूर पडणार नाही.

ह्या डायट मध्ये आपण सकाळी नाष्टा केलो, दुपारी पण जेवण केलं आणि रात्री पण जेवण केलं तर ह्या मध्ये कुठे पण भाकर, चपाती किंवा भात नाहीये आणि कुठला पण तेलकट पदार्थ नाहीये तरी पण तुमचं पोट भरणार आहे.

अशाप्रकारे तुमचं एका महिन्यात 5 किलो पर्यंत वजन कमी होणार आहे आणि ह्यासोबत जर तुम्ही थोडा एक्सरसाइज किंवा व्यायाम केला जसं की, चालणे वगैरे तर 10 किलो पर्यंत तुमच वजन कमी होऊ शकेल. हा डाएट फॉलो केल्यामुळे तुम्हाला तीन-चार महिन्यात 20-30 किलो पर्यंत वजन कमी करता येणार आहे.

तर फक्त व्हरायटी बदलून बदलून फळभाज्या, पालेभाज्या खावा आणि सुरुवातीला दोन-तीन दिवस त्रास होईल पण याचा रिझल्ट एकदम खात्रीशीर आहेत.

तर ह्या प्रकारे तुम्ही खुप खाऊन सुद्धा आपलं वजन कमी करू शकता.

धन्यवाद.

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. सर्वांचे आभार🙏.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *