जिऱ्याचे पाणी प्या आणि झटपट वजन कमी करा..! Jeera for weight loss in marathi

59 Views

नमस्कार मित्रांनो तर आज आपण जाणून घेणार आहोत की जीरा पाणी पिण्याने कशाप्रकारे आपण आपले वजन कमी होणार आहे.
हजारो वर्षापासून आपण वापरत असलेले जिरा आणि आता जीरापाणी ह्याचा फायदा काय आहे ? जीरा पाणी पिण्याचे योग्य वेळ आणि पद्धत कुठला आहे ? जिरा पाणी पिण्याचे काही दुष्परिणाम आहेत का ? तर हे सर्व आपण जाणून घेणार आहोत ह्या लेखामध्ये.

तर जिरा याला इंग्लिश मध्ये क्युमिन म्हणतात, उर्दूमध्ये जीरा म्हणतात, पंजाबी मध्ये चिट्टा जीरा म्हणतात, सिंधी मध्ये झिरो म्हणतात, गुजराती मध्ये जिरू म्हणतात, मराठीमध्ये जिरे, तमिळ, मल्याळम आणि कन्नड मध्ये जीराकम.

हे सगळे संस्कृत शब्द ‘जिराका’ ह्यापासून आलेले आहेत याचा अर्थ आहे पचन क्रिया. शब्दाच्या अर्थाप्रमाणे ह्याचा उपयोग आपल्या पचनशक्ती सुधारण्यासाठी करता येतो.

जिरा पाणी प्यायचं पहिलं फायदा-
Jeera यामध्ये थायमोल नावाचा एक घटक असतो जो आपल्या लाळे मध्ये मिसळून आपला अन्न पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतो. यामध्ये अजून एक घटक असतो जे आपल जेवण केल्यानंतर गॅस चा त्रास येतो ते दूर करू शकतो म्हणून, जर तुम्ही जेवणानंतर एक ग्लास जिरापाणी पिला तर तुम्हाला गॅस आणि पचन पचन संबंधीचे तक्रार आहे ते सगळं बंद होऊ शकेल.

जिरा पाणी प्यायचं दुसरं फायदा –
तर हे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करेल. खूप साऱ्या अभ्यासक्रमात सांगितलेला आहे की, जीरा पाणी हे आपलं वजन कमी करेल. एक महिना दररोज सकाळी जिरा पाणी पिल्यामुळे आपलं वजन कमी होईल. त्यामुळे आपण म्हणू शकतो की जीरा पाणी Weight Loss करण्यास मदत करेल.

जिरा पाणी प्यायचं तिसरा फायदा-

तर हे आपलं रोगप्रतिकार क्षमती वाढवण्यास मदत करते. एक चमचा जिरामध्ये 22.5 ग्राम कॅलरी, 1 ग्राम प्रोटीन आणि 0.6 ग्राम फॅट असते आणि 2.6 ग्रॅम कार्बोदके असतात. ह्याशिवाय जिऱ्यामध्ये विटामिन C, विटामिन E, व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन B 2 तसेच, आयर्न,कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस सुद्धा भरभरून असते. जिऱ्यामध्ये असलेले थायमोल आणि क्युमिनडीहाइड हे घटक आपलं सर्दी खोकला आणि खरखरणारे घसा कमी करू शकते.


तर आता आपण जाणून घेणार आहोत की जिरा पाणी कधी प्यावं, किती प्यावं आणि कसं प्यावं :

तर जिरापाणी आपण दिवसभरामध्ये कधीही पिऊ शकतो. पण वेगवेगळ्या वेळेला पिल्यामुळे वेगवेगळ्या फायदे होतात.

जसं की जर आपण लवकर सकाळी खुल्या पोटी घेतलं तर, आपलं पचनक्रिया सुधारण्यास मदत होईल, वजन कमी करण्यास मदत होईल, शुगर लेवल मेंटेन करण्यात मदत होईल. जेवणानंतर जर आपण जिरापाणी पिलो तर पचनक्रिया संबंधित सर्व तक्रारी दूर होईल जसे की गॅस, ऍसिडिटी हे सगळं दूर करेल. झोपण्या आधी आपण जर जिरा पाणी पिलो तर आपल्याला झोप चांगले येईल.

आता हे तर तुम्हाला ठरवावे लागेल की हे कुठल्या वेळी घ्यायचं आणि याचा अर्थ असा नाही की दिवसातून चार-पाच वेळा तुम्ही प्याल. दिवसातून एक ते दोन ग्लास जिरा पाणी पिणे फायदेशीर ठरेल. खूप जिरापाणी पिल्यामुळे तुम्हाला पोटाचा त्रास वगैरे चालू होण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त दिवसभरातून एक किंवा दोन ग्लास तुम्ही वापरू शकता.


जर तुम्हाला जिऱ्यापासून एलर्जी असेल तर तुम्ही ते टाळू शकता आणि गरोदर स्त्रिया, स्तनदा माता आहे ते पण जिरापाणी पिण्याचे टाळावे.


तर जिरा पाणी बनवण्याची सोपी पद्धत :

एक चम्मच जिरा थोडे पाण्यामध्ये घालून त्याला उकळावे. थोडं उकळल्यानंतर त्याला काडून घ्यावे आणि एका ग्लासमध्ये त्याला शोषून घ्या. जर तुम्हाला शक्य असेल तर जिरा एका ग्लास पाणी मध्ये रात्रभर भिजवून ठेवा त्यामुळे, त्यामधील सर्व असलेले घटक पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे शोषून घेईल.
धन्यवाद.

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. सर्वांचे आभार🙏.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *