पोटाची चरबी कमी करण्यासाठी टिप्स / How to Reduce Belly fat in Marathi

Spread the love
62 Views

नमस्कार मित्रांनो तर आज आपण बोलणार आहोत की बेली फॅट म्हणजे पोटाची चरबी.


चरबी हे आपल्या देशाचा म्हणा किंवा जगाचा सध्या मोठा प्रॉब्लेम आहे.सगळ्यात जास्त लोक आपल्याला ह्या गोष्टीवरती प्रश्न विचारत आहेत की पोटाची चरबी कशी कमी करावी ?

तर खरोखरच आपल्याला पोटाची चरबी कमी करायचा आहे का ? त्याच्या कुठली पद्धत आहे जे सगळ्यात लवकर आपलं Belly fat कमी करेल ? आणि सगळ्यात सोप्प पद्धत कोणती आहे ?

तर त्याला थोडा वैज्ञानिक रित्या माहिती करून घेऊ. तर आपल्या शरीरामधून स्पेसिफिक किंवा एका जागेतून आपण आपला फॅट कमी करू नाही शकत तर, आपल्याला आपल्या शरीरातून फॅट कमी करायचा असेल तर आपल्या पूर्ण शरीरातून कमी करावे लागेल.

जसे की आज मला आपल्या माझ्या मांडी मधून चरबी कमी करायचे आहेत तर मी फक्त मांडीची चरबी कमी करण्याची व्यायाम करेल तर, असं नाही होऊ शकत. तर चरबी आपल्या पूर्ण शरीरातून कमी करावा लागेल.

तर आपल्या शरीरातून चरबी कमी करताना आपल्याला पूर्ण शरीरातलं चरबी करण्यावरती आपल्याला फोकस करावा लागेल. त्यावेळी आपल्या शरीर ठरवेल की आपल्या शरीरातून सगळ्यात पहिला कुठून फॅट कमी करायचं.


पोटाची चरबी हे आपल्या अनुवंशिकतेने सुद्धा वाढू शकतो. जसे की आपल्या आई किंवा वडिलांची Belly fat जास्त असेल तर ते अनुवंशिक रिते आपल्या शरीरात पण होऊ शकते.
जर तुम्हाला तुमची पोटाची चरबी कमी करायचे असेल तर खालील काही उपाय तुम्हाला मदत करू शकते.

1) Belly fat साखर आपल्या जीवनामधून पूर्णपणे वगळा:


आपल्या पोटाची चरबी कमी करायचा असेल आणि वजन कमी करायचे असेल तर आपल्या जीवनामधून साखर पूर्णपणे वगळा.

जर तुम्हाला तुमच्या चहा किंवा कॉफीमध्ये थोडासा साखर वापरायचा असेल तर ठीक आहे पण सर्व साखरेचे पदार्थ आणि पेय पूर्णपणे सोडावे लागेल.

2) हॉटेलमध्ये जेवणे सोडा:
तर साखर सोडण्याबरोबरच आपल्या Belly fat कमी करायच असेल तर तुम्हाला बाहेरील जेवण पण टाळता आला पाहिजे.

पूर्णपणे बंद करू शकत नसेल तर कमी प्रमाणात बाहेर जेवा. आपला जीवन एन्जॉय करा पण थोडा कमी प्रमाणात.

तुम्ही बाहेरन खाऊ शकता जसे की आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बाकी आपल्या घरातलं जेवण हे आरोग्यदायी असते.

त्यामुळे घराचे जेवणावरती आपण लक्ष केंद्रित केला पाहिजे.

3) बाजारात मिळत असलेले तळलेले पदार्थ टाळा: Belly fat


तळलेले किंवा जास्त तेल घालून शिजवलेले बहुतेक पदार्थ स्निग्ध मानले जातात. त्यामध्ये फ्रेंच फ्राईज, बटाटा चिप्स, डीप-डिश पिझ्झा, ओनियन रिंग, चीजबर्गर आणि डोनट्स यांचा समावेश आहे.

बाजारात जे तळलेले पदार्थ मिळते ते बिलकुल घरात आणू नका.

त्यामुळे आपल्या शरीराचे खूप कॅलरीज वाढ होते त्याच्याच परिणाम होऊन आपल्या Belly fat वाढते आणि आपलं आरोग्य हे ढासळत जाते.

4) दररोज थोडा व्यायाम करा:
व्यायाम ही एक शारीरिक क्रिया आहे जी शारीरिक तंदुरुस्ती आणि संपूर्ण आरोग्य आणि निरोगीपणा वाढवते किंवा राखते.

जर आपल्याला यशस्वीरित्या आपल्या पोटाची चरबी कमी करायचा असेल तर दररोज थोडा व्यायाम करा.

जे लोक नियमितपणे व्यायाम करतात त्यांना हृदयरोग, टाइप 2 मधुमेह, स्ट्रोक आणि काही कर्करोग यांसारख्या अनेक दीर्घकालीन विकार विकसित होण्याचा धोका कमी असतो.

तर वरील उपाय वापरून तुम्ही पोटाची चरबी वाढण्यापासून रोखू शकाल.

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. सर्वांचे आभार🙏.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *