Big reasons for overweight / जास्त वजन असण्याची मोठी कारणे

Spread the love
33 Views

वजन वाढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे नेहमी काहीही खायला सुरू करणे. काही वेळा असे दिसून येते की, जर कोणी तुम्हाला काही खाण्यासाठी विचारले तर तेव्हा तुम्ही लगेच होकार देता, मग त्याने कोणत्याही वेळी का विचारलं असेना.

वजन वाढण्यामागे हीच सवय सर्वात महत्वाचे भूमिका वठवत असते. त्यामुळे हे महत्त्वाचे आहे की सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या जेवणाच्या सवयी सुधारा. आपल्या ठरवलेल्या वेळेनंतर तुम्ही काहीही खाता कामा नये.

1 औषधांचा अत्याधिक वापर

तब्येतीच्या जुजबी तक्रारीवरही औषधी गोळ्यांचा वापर आजच्या काळात अत्याधिक होऊ लागला आहे. परंतु लक्षात ठेवा प्रत्येक औषधाचा काही ना काही दुष्परिणाम नक्कीच असतो आणि सर्वात अगोदर ते तुमचे वजन वाढवतात.

जर तुम्हाला असे जाणवत असेल की, एखादे विशेष औषध घेतल्यापासून तुमचे वजन वाढत आहे, तर जराही उशीर न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2 अनुवांशिक हार्मोन्स

काही कुटुंबांमध्ये असे दिसून येते, की त्यांच्या कुटुंबामध्ये सर्व सदस्य लठ्ठ आहेत आणि ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आलेली आहे. त्यामुळे वजन वाढण्याचे हेसुद्धा एक मुख्य कारण असू शकते.

काही बाबतीत असे दिसून आले आहे की हे आपण रोखू तर शकत नाही, परंतु हे काही प्रमाणात कमी जरूर करू शकतो.

3 योगासने, हलका व्यायाम करा

 योगासने केल्याने आपले शरीर सक्रिय राहते आणि मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. योग करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येत असेल तर त्या जागी हलका व्यायाम केल्याने देखील वजन कमी करण्यास मदत होते.

4 रात्री लवकर झोपा 

रात्री खाल्लेले अन्न पचायला वेळ लागतो. त्यामुळे रात्रीचे जेवण लवकर करून चांगली झोप घेणे गरजेचे आहे. वजन कमी करण्यासाठी कमीतकमी 7 ते 8 तासांची झोप घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुम्हाला आराम तर मिळेच, शिवाय तुम्ही सकाळी पूर्ण स्पूर्तीने तुमच्या कामाची सुरुवात करू शकाल.

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. सर्वांचे आभार.

One thought on “Big reasons for overweight / जास्त वजन असण्याची मोठी कारणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *