Best Ways To Burn BELLY FAT in Just 7 Days / फक्त 7 दिवसात पोटाची चरबी जाळण्याचे उपाय

Spread the love
48 Views

तर आपल्या BELLY FAT कमी करण्यासाठी आपल्या जेवणामधून तुम्हाला साखर पूर्णपणे वगळावे लागेल.
जर तुम्हाला तुमची पोटाची चरबी कमी करून शरीराचं वजन मेंटेन करायचं असेल तर तुम्ही जास्त साखर आपल्या शरीरात घेणं बंद करा. त्याऐवजी तुम्ही नैसर्गिकरीत्या साखर आपल्या शरीराला कशा पद्धतीने भेटेल याचा विचार करा.

जसे की, काही फळे ,पालेभाज्या ज्यामधून आपल्या शरीराला साखर भेटेल. अशा पदार्थांचा तुम्ही वापर चालू करा जसे की ड्रायफ्रूट्स, सफरचंद, केळी ह्यामुळे बाजारात जे साखरेचे पदार्थ भेटतात जसे की चॉकलेट्स, केक, कुठले पण मिठाई अशा गोष्टी खाण्यापासून रोखण्यास आपल्याला मदत करेल. त्यामुळे तुम्ही आपल्या शरीराला कॅलरीज पण कमी देत आहात आणि गोड खायचं जे आपले भावना आहे ते पण कमी होणार आहेत.

आपली पोटाची चरबी कमी करण्यासाठी खाली काही उपाय दिले आहेत..

1-आपलं पोट भरल्यासारखं वाटू द्या

जसे की आपण फायबर रिच फूड घेतल्यामुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटेल. कमी कॅलरीज अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कॅलरी पण कमी भेटेल आणि आपलं पोट पण भरल्यासारखं वाटेल
ह्यामध्ये रिच फायबर असलेले पदार्थ आहेतच पण तुम्ही याच्यासोबतच काही ज्यूस पिऊ शकता, द्रव स्वरूपातील अन्न घेऊ शकत जे आपलं पोट भरल्यासारखं ठेवेल .

विटामिन C जास्त प्रमाणात असलेले पदार्थ तुम्ही खाऊ शकता जसं की संत्रे, मोसंबी हे आपल्या शरीराला पोट भरल्यासारखं जाणीव करून देईल आणि त्यामुळे तुम्ही नकळत जास्त जेवण नाही करू शकत.

2-पचनक्रिया सुधारण्यास मदत करेल असे पदार्थ वाढवा

खूप सारे लोकांना वजन कमी करताना किंवा BELLY FAT कमी करताना कॉन्टिपेशन किंवा लूज मोशनचा त्रास चालू होतो हे नैसर्गिक रित्या आहे. कारण जेव्हा तुम्ही कमी खाता तेव्हा आपल्या पोट बिघडते. त्यामुळे तुम्ही असं गोष्टी खावा जे कमी कॅलरी देईल आणि तुमचे पचनक्रिया पण सुधारेल. ज्यामुळे आपले लहान आतडे पोट सगळे शांत राहील.

तर असल्या पदार्थासोबतच तुम्ही आयुर्वेदापासून तयार झालेला ज्यूस पण घेउ शकता जसे की, कापीवा स्लिम ज्यूस जे तुम्हाला तुमची पोटाची चरबी कमी करण्यास मदत करेल. अशा प्रकारे बाजार मध्ये तुम्हाला खूप सारे आयुर्वेदिक ज्यूस भेटेल जे तुमची पोटाची चरबी कमी करण्यास मदत करेल आणि आपली पचनक्रिया पण चांगले ठेवण्यास मदत होईल.

आयुर्वेदिक ज्यूस मध्ये आवळा, हरद, संधी असे घटक असतात जे आपल्या शरीरासाठी चरबी कमी करण्यास मदत करतात त्याच प्रकारे आपली गोड खाण्याची इच्छाशक्ती कमी करते. त्यामुळे आपण कमी कॅलरी खाल्ल्यावर सुद्धा आपल्याला पोट भरल्यासारखं वाटू शकेल. त्याचप्रकारे हे आपले पचनक्रिया सुद्धा चांगले ठेवेल. त्यामुळे कमी खाल्ल्यामुळे जसं की पोटासंबंधी विकार कॉन्टिपेशन किंवा लूज मोशन असल्या तक्रारी दूर होईल.

3-कॅलरीच्या नोंदी ठेवा

BELLY FAT कमी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की, तुम्हाला हे समजायला पाहिजे की किती कॅलरी आपल्या आहारात येत आहे आणि किती कॅलरी बाहेर टाकावं लागेल.

जर तुम्हाला हे समजत नसेल तर तुम्हाला चरबी कमी करण्यासाठी खूप त्रास घ्यावा लागेल. तुम्हाला हे समजून घ्यावाच लागेल जर, तुम्हाला हे कळत नसेल तर हे तुमच्यासाठी खूप अवघड होईल.

तर हे समजून घ्या कॅलरी इन म्हणजे आपल्या शरीरात कॅलरीज कुठून कुठून येतात जसे कि जेवणाबरोबर म्हणा किंवा पिण्याबरोबर म्हणा जे पण तुम्ही मिठाई वगैरे खात आहात, कुठलेही पदार्थ खात आहात त्याच्याबरोबर म्हणा.
आता आपलं शरीरातील कॅलरीज बाहेर कसं होतं ते समजून घ्या. दिवसभर जे काम करतो ते सगळे कॅलरी जाळण्याशी निगडित आहे. तुम्ही सकाळपासून दिवसभर जे काही काम करता जसे की पाणी पिता, केस विंचरता, चालता हे सगळे गोष्टी आपल्या कॅलरी जाळण्याशी निगडित आहे. त्याचप्रमाणे आपल्या शरीराच्या आतील अवयव जे काही काम करतात जसे की श्वास घेणं, पचनक्रिया, तुम्ही काही विचार करत आहात हे सगळे गोष्टी कॅलरी बर्न करतात. तुम्ही जीम मध्ये जाऊन व्यायाम करत आहात हे सगळे गोष्टी आपल्या कॅलरीज बर्न करतात त्यामुळे आपल्या शरीरातून कॅलरी आऊट होतात.

जर तुम्ही कॅलरी खूप खात आहात आणि आपल्या शरीरातून कॅलरी आऊट खूप कमी प्रमाणात होत आहे तर आपलं फॅट किंवा चरबी हे कधीच कमी होणार नाही. कारण तुमच्या शरीरात कॅलरीज खूप प्रमाणात येत तर आहे पण कॅलरी बाहेर खूप कमी प्रमाणात चाललंय. त्यामुळे आपल्या शरीरातील चरबी तेव्हाच कमी होईल जेव्हा आपल्या शरीराकडे एक्सट्रा कॅलरीज नसेल जसे की तुम्ही खूप कमी कॅलरी शरीरात घेत आहात आणि कॅलरीज आऊट खूप मोठ्या प्रमाणे करत आहात अशाच परिस्थितीतच तुमच्या BELLY FAT होणार आहे.

तर वरील प्रमाणे तुंम्ही तुमचे सवयी बदलून आपली शरीरातील जास्त झालेली चरबी कमी वेळात कमी करू शकता.

Read more article : https://weightlossmarathi.com/how-to-lose-belly-fat-naturally-in-1-week-in-marathi/

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. 
सर्वांचे आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *