Avoid these food if you want to Lose Weight / वजन कमी करताना हे अन्नपदार्थ खाऊ नका

Spread the love
28 Views

तुम्हाला खरोखरच तुमचे पोटाची चरबी कमी करायचा असेल तर मी आज सांगणार आहे की रात्रीचे जेवणामध्ये काय खाऊ नये त्यामुळे आपली पोटाची चरबी कमी करून वजन कमी करण्यासाठी त्याचा मदत होईल. तर वेळ न घालवता चालू करा.
तर पोटात असलेल्या जास्त चरबी हे फक्त आपल्याला बेढब दिसायला कारणीभूत नाही तर आपल्या शरीरातील खूप सारी अवयवांना काम करण्यास अडथळा आणते.

त्यामुळे आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयासंबंधी त्रासाला कारणीभूत होते.
रात्रीचे जेवण हे खूप महत्त्वाचं जेवण असते. तुम्ही सकाळच्या जेवणामध्ये खाऊ शकता पण पण रात्रीच्या वेळी आपल्या पचनशक्ती हे मंदावत असते. त्यामुळे चुकीचे अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप त्रास चालू होतात.

रात्रीचे जेवणामध्ये तुम्ही जंक फूड खाल्ल्यामुळे नाही तर चांगले अन्नपदार्थ खाल्ल्यावर सुद्धा त्रास होऊ शकतात. कारण त्यावेळी आपले पचन शक्ती खूप मंदावले असते.

तर चुकीच्या अन्नपदार्थ रात्री खाल्ल्यामुळे आपल्याला वजन वाढू शकते किंवा आपल्या चेहऱ्याची ग्लो कमी होऊ शकते. केस गळणे. झोप न येणे. पोटात गॅस तयार होणे त्याचप्रमाणे अजून मोठे शरीरासंबंधी त्रास होऊ शकतात.
तर खालील अन्नपदार्थ तुम्ही रात्री कधीच देऊ नका.

1 जास्त प्रमाणात पान असलेले पालेभाज्या

तर पान मोठे असलेले पालेभाजी आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, विटामिन के, सी, ई आणि बी पासून भरपूर असतात.

जर तुम्ही असले पालेभाज्या रात्री खाल्ला तर ते पचायला खूप जड जातात. रात्री कधीच घेऊ नका आश्चर्य वाटतंय ना ? तर आपल्याला सगळेजण सांगतात की पालेभाज्या हे आपल्या शरीरासाठी चांगले असतात. पण ते कुठल्या वेळेला जेवला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. रात्रीच्या वेळी यांना परत खाल्ल्यामुळे ते पचायला खूपच जड जातात. तर रात्रीच्या जेवणामध्ये असल्या पालेभाज्यांपासून बनलेले भाजी खूप महागात पडते.

त्यामुळे आपल्याला झोप लागत नाही, डोकं दुखायला चालू होते. जर तुम्हाला असले पालेभाज्या खायचंच असेल तर जास्त प्रमाणात खाणे टाळा. जसे की फक्त पालेभाजी पासूनच भाजी बनवू नका.

2 सलाड

तुम्हाला वजन कमी करायचा आहे तर हे सल्ला तुम्हाला किती उपयोगी पडेल हे तुम्ही स्वतः बगा.

तर तुम्ही सलाड खाऊन स्वतःला त्रास करून घेत आहात कारण की, हे रात्री जेवणाचा अन्न पदार्थ नाही तर हे रात्रीचे अन्नपदार्थाचे एकदम विरुद्ध आहे. सलाड थंड पदार्थ आहे त्यामुळे पचन करताना त्याला खूप जास्त प्रमाणात ऊर्जा लागते. त्यामुळे आपल्या पचन क्रियेला जास्त प्रमाणात लाळ तयार करावे लागते. तर त्याचा अर्थ असा होतो की तापलेल्या तव्यावरती दोन-चार थेंब पाणी शिंपल्यासारखं होतंय. त्यामुळे रात्री आपल्या पोटात गॅस तयार होणे किंवा जुलाब लागणे आणि अपचन संबंधी क्रियेला आमंत्रण देते.

तुम्हाला जर सलाड खायचं असेल किंवा त्याच्याशिवाय तुमचं पोट भरत नसेल किंवा मन भरल्यासारखं वाटत नसेल तर त्याचा कमी प्रमाणात वापर करा. तर सलाड मध्ये तुम्ही जास्त पाणी असलेलं अन्नपदार्थ टाळा जसे की काकडी. अशाप्रकारे पाणी असलेले अन्नपदार्थ टाळा तर ह्या ऐवजी तुम्ही उष्ण असलेले पदार्थ निवडा जसे की गाजर, टोमॅटो, मिरची त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काळा तिखट वगैरे टाका कारण त्याचं गुणधर्म उष्ण आहे. त्याचप्रमाणे तुम्ही रात्री टोमॅटो, सूप, कॉर्न सूप तसेच मिक्स व्हेजिटेबल खाऊ शकता. त्यामुळे आपलं पचनक्रिया खूप लवकर ते पचन करेल.

3 दही

तर यामध्ये काही चुकीचं नाही की दही आपल्याला ताकद देते. खूप जास्त कॅल्शियम देते, फॉस्फरस, प्रोबायोटिक्स देते, अमिनो ऍसिड देते. तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला कधी पण खाल.

तर आयुर्वेदानुसार दही हे सूर्यास्तानंतर खाऊच नये. कारण रात्री सूर्यास्तानंतर आपल्या शरीराचं तापमान कमी होते. दही हे थंड अन्नपदार्थ आहे म्हणून दही खाल्ल्याने परिणाम आपल्या शरीराचा तापमान खूपच कमी होऊन आपल्याला खोकला लागू शकतो किंवा घशामध्ये खरं खरं करणे, नाक गळणे किंवा सायनस प्रॉब्लम, त्याचप्रमाणे ताप येणे अशा प्रकारचे त्रास आपल्याला चालू होऊ शकतात.

तर काही वेळेला जर तुम्हाला दही खावाच लागले तर त्याच्यामध्ये काळे तिखट घालून तुम्ही त्याचा थंडपणा घालू शकता. त्याऐवजी तुम्ही मठ्ठा पिऊ शकता म्हणजे ताक मध्ये तुम्ही तिखट, जिरा असले पदार्थ घालून त्याचं गुणधर्म हे उष्ण मध्ये बदलून तुम्ही ते पिऊ शकता. खरं तर हे सुद्धा चांगलं नाहीये पण दही खाण्यापेक्षा तर हे खूपच उत्तम आहे.

तर वरील पदार्थ तुम्ही रात्री न जेवता सुद्धा आपलं वजन कमी करू शकता.

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. 
सर्वांचे आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *