Amazing Natural Tips For belly fat / वजन कमी करण्यासाठी नैसर्गिक टिप्स

Spread the love
24 Views

“मला वाटते की माझं वजन खूप वाढलं आहे आणि मला बारीक व्हावंच लागेल.” पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय कसे शक्य आहे? ह्या विचाराचे रुपांतर काहीही करून वजन कमी करायचे उपाय शोधण्यामध्ये होते.

शरीर सुडौल राखण्यासाठी व्यायामशाळेत तासंतास व्यायाम करणे, जिभेवर ताबा ठेवत मिळमिळीत अन्नाची सवय लावणे असे अनेक उपाय आपण करून बघितले असतीलच. पण समजा तुम्हाला एक नैसर्गिक, दुष्परिणाम नसलेला, अत्यंत सुलभ आणि १५-२० मिनिटे घेणारा उपाय मिळाला तर कसं होईल?

याच बरोबर काही योगासन पण आपल्याला वजन कमी करण्यास मदद करतात – त्या योगासनांन बद्दल जाणून घ्या

ध्यान साधना

ध्यान साधना अतिशय सुलभ पण अत्यंत प्रभावी तंत्र. ध्यानसाधना तर मन शांत करण्यासाठी असते, मग त्याचा वजन कमी करण्याशी काय संबंध, असा विचार मनात येतोय का? ते कसे शक्य आहे ते पुढे पाहू या……..

जर तुम्ही वजन घटवण्याच्या “मोहिमेवर” असाल तर नियमितपणे BMR *(Basal Metabolic Rate) म्हणजेच  खाल्लेल्या अन्नाचे ऊर्जेत रुपांतर करण्याची गती तपासण्याची गरज असते. तुम्हाला तुमच्या शरीराचा BMR माहित असेल तर तुम्ही तुमच्या जेवणातील कॅलरीज कमी करू शकता, जेणेकरून वजन आपोआप नियंत्रित राहील. ध्यान केल्याने तुमचे BMR आपणहून कमी होते. म्हणजेच अतिरिक्त कॅलरीज घेण्याचे प्रमाण आपसूकच कमी होते ज्यामुळे वजन आपोआपच कमी होते.

तुमच्या लक्षात आले असेल की जर तुम्ही काही दिवस व्यायाम केला नाहीत तर लगेच तुमचे वजन पुन्हा वाढू लागते. ह्याचे कारण, तुम्ही जेवढे जेवता तेवढ्या कॅलरीज जाळत नाही. व्यायाम केल्याने फक्त तुमची भूक वाढते पण अन्नाचं शरीरात पूर्णपणे संमिलन होत नाही.

योगाभ्यास

योगाभ्यास केल्याने अन्नाचं शरीरात पूर्णपणे संमिलन होण्याच्या प्रक्रियेला गती मिळते व जड असलेले अन्न सेवन करण्याची रुची कमी होते. म्हणजेच भूक तर लागते पण थोडेसे खाऊन तृप्ती येते. ह्याचा दीर्घकालीन परिणाम असा होतो की तुम्ही काही दिवस व्यायाम सोडला तरी वजन लगेच वाढत नाही.

वजन कमी करण्यात सगळ्यात मोठा अडसर म्हणजे लज्जतदार पदार्थ खाण्याची लागलेली चटक. एखाद्या मिठाईच्या दुकानाजवळून जाताना आसपास दरवळणाऱ्या गोड वासामुळे तो पदार्थ घेऊन खाण्याचा मोह आवरत नाही. पण नियमित ध्यान केल्याने मनावर ताबा ठेवणे थोडे सोपं होते.

ध्यान केल्याने जागरूकता वाढते, आपल्याच खाण्या-पिण्याच्या सवयींबाबत सतर्कता वाढते. मग पुन्हा कधीही तुम्ही चॉकलेट किंवा चिप्स घ्यायला जाल तेव्हा तुम्ही सतर्क व्हाल की हे खाल्ल्याने माझे वजन वाढेल. मग त्याऐवजी तुम्ही दुसरे काही तरी पौष्टिक पर्याय शोधाल. काही कालांतराने नियमित ध्यान केल्याने तुमच्या इच्छा नाहीशा होतात. मग तुम्ही ते चिप्स किंवा चॉकलेट घेण्यास कधीच जाणार नाहीत.

दिव्या सचदेव म्हणतात, “गेल्या एका वर्षापर्यंत मला चॉकलेट खाण्याची इतकी सवय होती की ,दिवसातून एक तरी चॉकलेट खाल्ले नाही तर मी अस्वस्थ व्हायचे. माझे वजन भरपूर वाढत होते पण ह्या सवयीचा त्याग कसा करावा तेच कळत नव्हते. पण दोन महिने नियमित ध्यान केल्याने चॉकलेट खाण्याची तीव्र इच्छा / वासना / लालसा कमी झाली.  मी नियमीतपणे ध्यान करणे चालू ठेवले आणि माझं वजन ७ किलोनी कमी झाले”.

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. सर्वांचे आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *