4 Amazing Drinks For Fat Loss / चरबी कमी करण्यासाठी 4 आश्चर्यकारक पेये

Spread the love
31 Views

जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी कमी करायचा आहे तर तुम्हाला आपल्या जीवनामध्ये पाच प्रकारचे अन्नपदार्थ समावेश करावा लागेल.

तर आज आपण चर्चा करणार आहोत की कशा प्रकारे ते आपलं आपल्याला घेता येईल आणि कधी आपल्याला ते खाता येईल ज्यामुळे आपल्या पोटाच्या चरबी खूप कमी वेळामध्ये कमी होईल. तर वेळ न घालवता चालू करूया..
तर आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी हे फक्त दिसायला बेडब न दिसता आपल्या शरीरासाठी खूप धोकादायक आहे. तसेच इतर अवयवांचा कार्य करण्याची क्षमता सुद्धा कमी करते.

तसेच हे काही विकारांना आमंत्रण देते जसे की जसं की आपल्या लिव्हरला जाड करणे(fatty liver), टाईप टू डायबिटीस, हार्ट ब्लॉकेज आणि हाय ब्लड प्रेशर. त्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करणे हे खूप महत्त्वाचा आहे.

तर चला आज आपण जाणून घेणार आहोत 4 अशा प्रकारे पेये ज्यामुळे आपले वजन कमी होईल. हे पाच अन्नपदार्थ फक्त आयुर्वेदानुसार चांगले नसून आत्ताच्या वैज्ञानिक संशोधनानुसार सुद्धा ही सांगितलेला आहे की हे वजन कमी करण्यासाठी चांगले आहेत.

1-गरम पाणी

झिरो कॅलरी खूप चांगले उपाय आणि आपले वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अभ्यास असं सांगते की गरम पाणी हे आपल्या चरबीला ब्रेक करून त्याचं मॉलिक्युल्समध्ये बदल करते.
गरम पाणी पिल्याने आपल्या शरीराचे तापमान वाढते आणि त्यामुळे आपल्या शरीरातील मेटाबोलिझमच प्रमाण सुद्धा वाढते. त्यामुळे आपलं रक्त भिसरण सुद्धा वाढते परिणामी आपलं वजन कमी होते.

जर तुमचं पोटाची चरबी हे खूप मोठा आहे तर तुम्ही गरम पाणी प्यायला सुरुवात करा. मोठं पोट म्हणजे फक्त चरबी नसते त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अपचन झालेले पदार्थ असतात.
तर एका अभ्यासानुसार हे माहिती झालेले आहे की सकाळी उठल्या उठल्या गरम पाणी पिल्याने आपलं पचनक्रिया सुधारते आणि आपले पोट साफ होण्यास मदत करते त्यामुळे आपलं पोटाची आकार हे कमी व्हायला मदत होते. त्यामुळे गरम पाणी दिवसभर आपल्या सोबत ठेवा.

Specially जेव्हा तुम्ही जेवणा अगोदर गरम पाणी पिता ते शरीरासाठी चांगले नसलेले अन्नपदार्थ खाण्यास रोखू शकते. त्याचप्रमाणे आपल्या रक्तातील घातक घटक कमी करण्यास मदत करते तसेच, रक्तामधील वेस्ट हे आपल्या किडनी मधून लघवी वाटे शरीराबाहेर जाण्यास मदत होते.
त्याच प्रकारे तुम्ही गरम पाण्यामध्ये लिंबू पिळून सुद्धा पिऊ शकता. आता प्रश्न पडतो की पाणी किती गरम असायला पाहिजे ? तुम्ही चहा जेवढं गरम पिता तेवढं पाणी गरम करू शकता. तर पुढच्या वेळेस तुम्हाला काही प्यावं वाटत असेल तर गरम पाणी प्या.

2-आवळा ज्यूस

तर आयुर्वेदामध्ये आवळा, कोरफड आणि अद्रक ह्याला खूप महत्त्वाचे स्थान आहे कारण की यामध्ये असलेले घटक आपले वजन खूप आश्चर्य रित्या कमी करू शकतात.
आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन c आपले मेटाबोलिजम वाढवते आणि आपलं चरबी जाळण्यास मदत करते. एका अभ्यासक्रमानुसार हे सांगितलेलं आहे की जे लोक दिवसभरात आवळा खातात त्यांना भूक कमी लागते आणि त्यामुळे आपल्या शरीरात खूप कमी कॅलरीज प्रवेश करतात.

त्याचप्रमाणे आवळा मध्ये अँटिऑक्सिडंट खूप प्रमाणात आहे ते आपल्या पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

3- एलोवेरा म्हणजे कोरफड ज्यूस

यामध्ये फायबर खूप प्रमाणात असते परिणामी आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी होते.

तर अभ्यासक्रमात अशाप्रकारे साबित झालेला आहे की एलोवेरा ज्यूस म्हणजे कोरफड ज्यूस हे फक्त आठवड्यासाठी घेतल्याने आपले पोटाचे चरबी खूप प्रमाणात कमी झालेला आहे.

4-अद्रक ज्यूस

हे आपला मेटाबोलीजम नियंत्रित करण्यासाठी मदत करते. त्यामुळे आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतंय. परिणामी आपलं पोटातील चरबी खूप लवकर कमी होते.
अद्रक ज्यूस चा वापर अभ्यासासाठी एका जाड असलेल्या उंदीराला पिऊ घातले होते. परिणामी त्याचा अन्नपचनक्रिया अशाप्रकारे सुधारले की ते दोन आठवडामध्ये त्याचं आकार खूप प्रमाणात कमी झाला.

त्यामुळे वरील तिन्ही प्रकारचे ज्यूस हे त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये खूप प्रसिद्ध आहेत.
त्यामुळे सकाळी नाश्त्यापेक्षा एक तास अगोदर तुम्ही चार चमचे आवळा ज्यूस चार, चमचे कोरफड ज्यूस मध्ये एक चमचा अद्रक ज्यूस मिक्स करून त्यात पाणी त्याच्यामध्ये मिक्स करा.

पाणी तुम्ही थंड पण घेऊ शकता आणि गरम पण घेऊ शकता. तर अशा प्रकारचे ज्यूस दररोज दोन महिन्यासाठी घ्या. तर ते एवढं यशस्वीरित्या काम करते की ते तुमचं चरबी वितळवते आणि वजन कमी करते.

Read more article : https://weightlossmarathi.com/5-simple-ways-to-lose-belly-fat-in-marathi/

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. 
सर्वांचे आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *