3 Amazing Tips For Weight Loss / पोटाची चरबी कमी करण्यासाठी 3 उपाय

Spread the love
32 Views

खूप वेळा लोक म्हणतात की सगळं काही चांगलं चाललेलं आहे पण हे पोटावरती जे चरबी वाढलेला आहे ते कमी होईना. नो dought पोटाची चरबी हे त्रासच कारण तर आहे.

मी तुम्हाला आज अशा गोष्टी सांगणार आहे जे फक्त आधुनिक संशोधनच नाही तर आयुर्वेदिक तज्ञानुसार सुद्धा पोटाची चरबी करण्यासाठी उपयोगी आहे. जर तुम्ही हे नियम पाळला तर त्याच्यामध्ये संदेहच नाही की थोड्या दिवसात तुमची पोटाची चरबी कमी होईल. खूपच साधे आणि प्रॅक्टिकल उपाय आहेत. तर चला चालू करूया.


मित्रांनो समजा जर आपल्या पोटाची चरबी जास्त वाढू लागले तर आपल्याला समजायला पाहिजे की पोटात विसरल फॅट वाढत आहे. विसरल फॅट म्हणजे ते चरबी जे आपल्या शरीरातील अवयवांना झाकून ठेवते. जसं की आपल्या पोटासोबतच आपले किडनी, यकृत, स्वादुपिंड आणि आतड्यांना घेरु लागते. हे जे पोटाची चरबी आहे हे फक्त दिसण्यासाठीच खराब नसते तर आधुनिक विज्ञान त्याला खूप घातक असते संबोधित करते.

पोटामध्ये जे चरबी वाढते ते आतल्या अवयवांचं कामकाज ठप्प करते. त्याचप्रमाणे नवीन विकारांना आमंत्रण देते जसे की फॅटी लिव्हर. टाईप टू डायबिटीज, त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब.
कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीराचा मेटाबोलिझम वाढते. पोटाची चरबी कमी करणे खूप महत्त्वाचे आहे. ह्या गोष्टीला ध्यानात ठेवून आज मी अशी गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे पोटातील चरबी हे कमी होईल.

1 सतत पाणी प्या

दररोज सकाळी उठल्यावर दात घासायच्या अगोदर थोडं कोमट पाणी प्या. त्याच्यामध्ये काहीही घालू नका फक्त पाणी प्या. कोमट पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराचा मेटाबोलिजम वाढल्यामुळे आपल्या शरीरातील चरबी कमी व्हायला सुरुवात होते.

गरम पाणी पिल्यामुळे आपले पचनशक्ती वाढते. त्यामुळे सकाळीच आपलं पोट चांगल्या प्रकारे साफ होईल. पोट स्वच्छ झाल्यामुळे आपल्या पोटात जे खूप दिवसापासून साचलेलं मल असते ते बाहेर पडते. त्यामुळे आपलं पोट कमी होईल.

सकाळी पाणी किती पिले पाहिजे ? हे तुमची मर्जी. कमीत कमी एक ग्लास तर पाणी प्या. त्याचप्रमाणे जेवणाच्या मध्ये मध्ये पाणी पीत जावा. जसे की सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवणामध्ये किंवा दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणामध्ये जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की मला थोडं भूक लागत आहे तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा पाणी प्या.

खूप वेळा आपल्याला खरोखर भूक लागले नसते फक्त आपली बॉडी किंवा शरीराला पाण्याची कमतरता वाटत असते त्यामुळे पाणी प्या. त्याच्यामुळे आपल्याला खूप वेळा पोट भरल्यासारखं वाटतंय. पोट भरल्यासारखं वाटल्यामुळे जे आपण जरूर नसताना पण बाहेरच खातो ते कमी होईल. बाहेरचं खात नाही त्यामुळे शरीरात जास्त कॅलरी जात नाही त्यामुळे आपलं पोट आपोआपच कमी होईल.

2 साखर बंद करा

मित्रांनो रिफाईंड साखरेला तर दुरूनच नमस्कार करा. उदाहरणार्थ गुलाब जामुन घ्या त्याच्यामध्ये काही संदेह नाही की गुलाब जामुन खूप चवीचं पदार्थ आहे. त्याला फक्त बगता क्षणीच आपल्या तोंडाला पाणी सुटते.

पण त्याच्यामध्ये असं एक पण गोष्ट नाही की ज्याच्यामुळे आपल्या शरीराला फायदा होईल. जेव्हा तुम्ही गुलाब जामुन खाता तेव्हा हे आपल्या शरीराला एवढा साखर देते,एवढं तेल देते, एवढं कॅलरी देते आणि हे मैदा पासून तर बनलेले असते.

विज्ञान आज साखरेला सगळ्यात महत्त्वाचं कारण मानत आहे चरबी वाढण्याचा. साखर बनवताना एवढं केमिकल वापरून त्याला फिल्टर करतात की त्याच्यामध्ये न्यूट्रिशन नावाचं काहीच नसते. असला साखर हे आपल्या शरीरामध्ये पचत नाही, त्याचप्रमाणे इन्सुलिन वाढवते.


त्यामुळे आपल्या शरीरातील चरबीमध्ये वाढ होते. चवीचा चक्कर मध्ये आपण हे चरबी आपल्या शरीरामध्ये आणतो. त्यामुळे रिफाईंड साखरेपासून बनलेल्या मिठाई जसे की जिलेबी, पेस्ट्री, बिस्किट, डोनट आणि कॅंडी सारख्या वस्तू पासून दूरच राहावा. तुम्ही फक्त दहा दिवस सुद्धा साखरेपासून दूर राहाल ना तर तुम्हाला समजेल की तुमची पोटाची चरबी कमी झालेला आहे.

3 प्रोटीन जास्त खावा

आपली पोट कमी करण्यासाठी प्रोटीन वाढवावा लागेल. प्रोटीन वजन कमी करण्यासाठी एवढा मदत करते की याच्यावरती खूप काही संशोधन झालेत. मित्रांनो प्रोटीन हे एक असं न्यूट्रियंट आहे जे सावकाश सावकाश पचते. त्यामुळे आपलं पोट खूप वेळापर्यंत भरलेला असते.

त्यामुळे आपल्याला सारखा सारखा खावसं वाटणार नाही. संशोधन असं सांगते की प्रोटीन्समुळे शरीर स्वतः जास्त झालेले कॅलरी जाळू लागते. तर प्रोटीन सांगितलं म्हणून माझं असं म्हणणं की प्रोटीन पावडर खावा. कुठल्याही सप्लिमेंट ची आपल्याला जरूरत नाही. कुठले पण दाळ घ्या प्रोटीन पासून भरपूर युक्त आहेत जसे की चना, राजमा, त्याचप्रमाणे दूध, दही, पनीर, सगळ्या पालेभाज्या सुद्धा प्रोटीन पासून युक्त आहेत.

तर आज संशोधन असं सांगत आहे की व्हेजिटेरियन प्रोटीन्स हे नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन्स पेक्षा खूप चांगले आहेत. कारण आपल्या शरीर हे व्हेजिटेबल खूप लवकर पचन करते. तुम्ही फक्त हे ठरवा की आपल्या दररोजच्या जेवणात प्रोटीन ठेवायचा आहे. जसे की सकाळी नाष्ट्यामध्ये पनीर भुर्जी सोबत रोटी खावा किंवा ताजे ताजे फळ खावा. तसेच दुपारच्या जेवणामध्ये चण्याची भाजी घ्या किंवा कुठल्या पण भाजी सोबत दूध किंवा दही भाकरी सोबत खाऊ शकता. रात्री च्या जेवणामध्ये डाळ आणि भात खावा बस.

एवढा प्रोटीन आपल्या शरीरासाठी भरपूर आहे. अशाप्रकारे जेव्हा तुम्ही ठरवून आपल्या जेवणामध्ये प्रोटीन वाढवता त्यावेळी तुम्ही जास्त खाण्यापासून स्वतःला रोखू शकाल. ज्यामुळे आपण बाहेरील जंक फूड कमी खातो चरबी कमी होईल.

तर अशा सवयींना आपण स्वतःच्या दररोजच्या नित्यक्रमात आचरण्यात आणलो तर खूपच कमी दिवसात आपली जे वाढलेले पोटाची चरबी आहे ते लवकरात लवकर कमी होऊ शकेल.

धन्यवाद.

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. 
सर्वांचे आभार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *