झटपट पोटावरील चरबी / फॅट कमी करण्यासाठी योगासने / व्यायाम

Spread the love
63 Views

नमस्कार मित्रांनो आज आम्ही 4-5 किलो वजन कमी करणारे योगासन आणि एक्सरसाइज बद्दल माहिती करून घेऊ. हे उपाय घरी करण्यासारखे सरळ आणि साधे आहेत. दररोज फक्त 30 मिनिट ते एक तास केल्यावर 4-5 किलो वजन कमी होईल.

शक्यतो सकाळी 7 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान व्यायाम करावा. व्यायामाची सुरुवात करण्यापूर्वी वॉर्मअप करायला विसरू नका. वॉर्मअप केल्यामुळे शरीरातील स्नायू मोकळे व्हायला मदत होते आणि व्यायामादरम्यान शरीरावर अनावश्यक ताण पडत नाही. रोज किमान 30 मिनिटं व्यायाम करावा. 30 मिनिटांपेक्षा जास्तवेळ व्यायाम करायचा असल्यास काहीच हरकत नाही. पण व्यायाम करण्याची सवय नसल्यास कालावधी हळूहळू वाढवावा. घरच्या घरी करता येण्यासारखे काही व्यायाम प्रकार पुढीलप्रमाणे..

टो टच एक्सरसाइज

खाली वाकून नाक गुडघ्याला आणि हातांनी पायाची बोटं धरा. हे करताना गुडघे वाकणार नाहीत याची काळजी घ्या. हा व्यायाम खाली बसून देखील करता येऊ शकतो. साधारणपणे पंधरा वेळा हा व्यायाम केल्यानंतर दहा सेकंदाची विश्रांती घेऊन पुन्हा पंधरा वेळा करा.

पुशअप्स-

पोटावर झोपून हात खांद्याच्या रेषेत सरळ राहतील याची काळजी घ्या. त्यानंतर हात आणि पायाच्या मदतीनं शरीराचा वजन सांभाळा. हातातून वाकून वर-खाली असा व्यायाम करा. एका सेटमध्ये पंधरा याप्रमाणे रोज तीन सेट केल्यास फायदेशीर ठरेल.

एअर सायकलिंग-

हा व्यायामप्रकार पोटाचा घेर कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामध्ये जमिनीवर झोपून हातांना डोक्याच्या मागे ठेवावं. यानंतर पाय सरळ रेषेत वर उचलून सायकल चालवतोय असं समजून पायांची हालचाल करावी.

उठाबशा

सर्वप्रथम ताठ उभं राहून दोन्ही हात समोर ठेवा. त्यानंतर हळूहळू गुडघ्यात वाकून तुम्ही खुर्चीवर बसण्यासाठी वाकत तसं बसा आणि परत उठा. ही पूर्ण प्रक्रिया साधारणपणे दहा मिनिटं करावी. वरील व्यायामप्रकारांशिवाय विविध नृत्यप्रकारही करू शकता.

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. सर्वांचे आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *