Know your food / आपले अन्न जाणून घ्या

Spread the love
31 Views

अयोग्य जीवनशैलीमुळे लठ्ठपणा वाढत आहे. यात ‘ल्टरापरोसेस्ड रिफाइंड ‘फूड’चे वाढलेले सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. यामुळे योग्य जीवनशैली आत्मसात करीत, खाण्याच्या सवयी सुधारणे, उच्च ‘फायबरयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. *डायटरी फायबर’ म्हणजे काय? हे. ‘पॉलिसेकेराइड’ आहे. जे वनस्पतींपासून प्राप्त होते. यामध्ये ‘ ‘पैक्टिन’ आणि प्रतिरोधक स्टार्च यांचा समावेश असतो.

जेवण तयार करताना हे. पदार्थ फारसे बदलत नाहीत. फळे आणि भाज्यांमध्ये विरघळणारे फायबर आढळतात तर तृणधान्ये आणि संपूर्ण धान्यांमध्ये अघुलनशील फायबर असतात.

आहारातील फायबरचे स्रोत कोणते ?

रिफाइंड आणि प्रक्रिया केलेल्या अन्नामध्ये फायबरचे प्रमाण फारच कमी असते. साखर, तेल, दूध आणि मांसामधील आहारात फायबर अजिबात नसते. गव्हाचे पीठ, कोंडा, कंद-मुळे, शेंगा, वाटाणे, सफरचंद आदींमध्ये सेल्युलोजच्या रूपात अघुलनशील फायबर असतात.

गाजर आणि फळांमध्ये अघुलनशील *लिसिन’ तर, पालेभाज्यांमध्ये भरपूर फायबर असतात.

आहारातील फायबरचे ‘मेटाबॉलिझम कसे होते ?

आहारातील फायबरचे तुकडे आत्यांपर्यंत पोहोचतात आणि फॅटी ऑसिडमध्ये रूपांतरित होतात. ते उलुकोज, चरबी आणि कोलेस्टेरॉलचा ‘मेटाबॉलिझम’ म्हणजे चयापचयावर परिणाम करतात.

‘शॉर्ट चेन फॅटी असिड’ आपल्या ऊर्जेच्या गरजांमध्ये १० टक्के योगदान देतात. मोठ्या ‘फायबरमध्ये जास्त पाणी असते जाणून घ्या आहारातील फायबर व फायदे आणि शेवटी सर्व तंतू विष्ठेच्या रूपातून बाहेर पडतात. आहारातील फायबर व लठठपणाचा संबंध ? लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात.

आहारातील फायबर वजन कमी करण्यास मदत करते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले की, २ वर्षांसाठी दररोज २० ग्रॅमपेक्षा जास्त आहारातील फायबरचे सेवन केल्याने लडठपणा कमी होतो. लट्ठुपणाच्या व्यवस्थापनात आहारातील ‘फायबरचा मोठा वाटा असतो.

आहारातील फायबर आणि उच्च ‘कोलेस्टेरॉलचा संबंध :-

फायबर हे. कॅलरीजचे सेवन मर्यादित करण्याव्यतिरिक्‍त फॅटी अँसिड, कोलेस्टेरॉल आणि पित्त शोषून घेतात. *हाय डायट फायबर’ हे कॅलरींना प्रतिबंधित करते. सोबतच ग्लुकोजचे शोषण कमी करते.

उच्च फायबरमुळे इन्सुलिनची संवेदनशीलतादेखील वाढते. उच्च फायबर आहार मधुमेहाच्या रुग्णांमध्ये ‘ऑक्‍्सिडेटिव्ह’ तणावाला कमी करतो. ज्या रुग्णांना ‘टाइप-२” मधुमेह होण्याची शकयता असते, त्यांनी उच्च फायबरयुक्त आहार घेणे फायदेशीर ठरू शकते. आहारातील फायबर बद्धकोष्ठता कमी करू शकतो ? आतड्यांमध्ये असलेले फायबर पाणी टिकवून ठेवतात आणि बद्धकोष्ठता टाळतात.

ते भूक कमी करतात कारण ते तृप्तीची भावना देतात. यामुळे, पुन्हा पुन्हा खावेसे वाटत नाही. ‘ज्यामुळे कॅलरीजचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. स्टूलचे प्रमाणही वाढते. कोलोरेक्टल कर्करोग रोखते? कोलोरेक्टल कर्करोगाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

असे मानले जाते की आहारातील फायबर ही प्रकरणे कमी करू शकतात. ते आतड्यांमध्ये असलेल्या कार्सिनोजेन्सला पातळ करतात. ज्यामुळे मल जलद बाहेर येतो. यामुळे, आतड्यांसंबंधी भिंतीशी या. कार्सिनोजेन्सचा संपर्क वेळ मोठ्या प्रमाणात कमी होतो. ते आतड्यांसंबंधी जळजळदेखील कमी करतात. एकूणच पोटाचे आरोग्य सुधारते.

हा आजचा लेख असून पुढील लेखात आपण आणखी एक विषय घेऊन येऊ.जर तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांसह शेअर करा. ही कल्पना फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप शेअर करायला विसरू नका. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *